Latest NEWS

WELCOME TO SHREE SANKALP


       विविध शिक्षण संस्था टप्प्या टप्प्याने सुरु करणे व चालविणे. उदा. अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महा विद्यालय, तंत्र शाळा, सि.एन.सी. कोर्सेस, विविध प्रकारचे टेक्निकल कोर्सेस, अभियांत्रिकी कॉलेज, वैद्यकीय कॉलेज, आश्रमशाळा, निवासीशाळा, संगणक प्रशिक्षण कायद्याचे शिक्षण पर्यावरण,कृषीशाळा, कृषी महाविद्यालय, माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान औषध शास्त्र, अध्यापन पदविका व पदवी, आय.टी.आय, हॉटेल मॅनेजमेंट व्यवस्थापन शिक्षण, संगीत, कला, नृत्य व मुकबधीर, अपंग, अंध निराधार मुलांचे शिक्षण, निमवैद्यकीय शाखेचे अभ्यासक्रम ( पॅरामेडीकल कोर्सेस ). संस्थेच्या विविध शाखांमधून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत, गुजराथी, कन्नड, तमिळ इ. भाषांमधून शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सोय करणे व विविध शैक्षणिक प्रकल्पासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु करणे. तसेच मुलांच्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने शिकवणी वर्ग चालविणे. मागासवर्गीय, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, हुशार व होतकरू विद्यार्थ्याकरिता सर्व प्रकारचे वसतीगृहे, बोर्डिंग, स्कूल सुरु करणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळवून देणे व त्याना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करणे व पुस्तक पेढी सुरु करणे.

        शैक्षणिक गुणवत्ता व सुसभ्य अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय, खेळांसाठी क्रीडांगणे प्रशासकीय सेवेतील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देणे. उदा. एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी.,एन. टी. एस. इत्यादी तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, माध्यमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षांचे तज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन सुरु करणे. विध्यार्थ्यांना शैक्षणिक शारिरीकविकासाबरोबर त्यांचे विविध प्रकारचे छंध जोपासण्या करिता खास मार्गदर्शन करणे व अशा रीतीने त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे. त्यासाठी मैदानी खेळांच्या विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व पार पाडणे.

       तंत्र प्रशिक्षकां मार्फत खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे अत्याधुनिक साहित्यांनी उपयुक्त अशी व्यायाम शाळा सुरु करणे व त्यात आसन, प्राणायाम, योगासन वर्ग, योगप्रशिक्षण चिकित्सा व संशोधन निसर्गोपचार यांचे प्रशिक्षण देणे.

        विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याकरिता व्यवसाय मार्गदर्शन, चरित्र संवर्धन व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ व्यक्ती कडून मार्गदर्शनपरव्याख्याने आयोजित करणे. लघु उद्योगांना व औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणारे पुरक असे सी.एन.सी. कोर्स व विविध प्रकारचे टेक्निकल कोर्सेस, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, क्राफ्ट, टेलरिंग, फोटोग्राफी, पेंटिंग इ. फॅशन डिझायनिंग, इनटिअर डेकोरेशन इनफॉरमेशन टेक्नोलॉजी, फुड प्रोसेसिंग इ. प्रकारचे तांत्रिक कोर्सेस सुरु करणे प्रशिक्षण देणे उदा. शेळी पालन, कुक्कुटपालन, मत्सोपलो उत्पादन, दुग्ध व्यवसाय, इमूपालन, वरः पालन तसेच बालवाडी कोर्सेस सुरु करणे.

क्रीडाविषयक :- तज्ञ प्रशिक्षकांमार्फत कराटे, खोखो, कबड्डी यांसह विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे. क्रीडा संकुल सुरु करणे. अत्याधुनिक व्यायाम साहित्यांनी उपयुक्त व्यायामशाळा सुरु करणे. प्राणायाम, योगासन वर्ग सुरु करणे. रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करणे.

सामाजिक :-

1. मुले व महिलांचे विकासासाठी कार्य करणे. साक्षरता प्रसार, प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करणे.

2. पर्यावरण संतुलनासाठी व्रुक्षरोपण सुरु करणे.

3. सर्व आपत्तीग्रस्तांना गरजूंना मदत करणे त्यात प्रामुख्याने जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी विषेश प्रयत्न करणे.

4. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणे.

5. व्यसनमुक्ती बाबत विविध कार्यक्रम आयोजित करणे.

6. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बालसंगोपन भवन, महिलाश्रम सुरु करणे.

7. सर्वतोपरी मदत करणे.पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड, वृक्ष वाढ व जोपासणा कार्यक्रम राबविणे.

8. प्राण्यांवर होणारे अत्याचाराला विरोध करणे.

9. दुर्मिळ होत असलेल्या प्राणी व पक्षी यांचे संवर्धन होणेसाठी प्रयत्न करणे. त्यासाठी समाजात जनजागृती करणे.

10. नवीन ऊर्जाविषयक संशोधन व वापर करणे.

11. आरोग्य व कुटुंब कल्याणासाठी कार्य करणे.